तिरुपती बालाजी मंदिरातील भाविकांच्या अर्पण केलेल्या केसांची चीनमध्ये तस्करी

मिझोराममध्ये पकडले १ कोटी ८० लाख रुपयांचे केस !

अशा प्रकारची तस्करी हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळामधून होते, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! उद्या अशा कुचकामी सुरक्षायंत्रणेमुळे आतंकवादी आक्रमण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आसाम रायफल्स

बेंगळुरू – आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जाणारे भाविक केस अर्पण करतात. यामुळे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. येथे प्रतिदिन सहस्रो भाविक केस अर्पण करतात. या कापलेल्या केसांची चीनमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. आसाम रायफल्सने हे उघडकीस आणले आहे. म्यानमारच्या मार्गाने चीनमध्ये तस्करी केली जात होती. आसाम रायफल्सने मिझोराममध्ये अशा प्रकारची तस्करी उघड केली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार २ ट्रकमध्ये गोण्या भरून हे केस नेण्यात येत होते. ट्रकमध्ये ५० किलो केस सापडले. याची किंमत १ कोटी ८० लाख रुपये आहे.

या केसांची ट्रकद्वारे वाहतूक करण्यात येत होती. या ट्रकमधील लोकांनी मान्य केले की, ते तिरुपती येथील केस म्यानमार येथे नेत होते आणि तेथून ते थायलंडला पाठवण्यात येणार होते. चीनमध्ये या केसांचा वापर ‘विग’ बनवण्यासाठी होतो. या ‘विग’ची विदेशात निर्यात केली जाते. जगात ७० टक्के विगची निर्यात चीनकडून केली जाते. केवळ तिरुपतीच नव्हे, तर अन्य धार्मिक स्थळांवरून अशा प्रकारचे केसांची तस्करी केली जात आहे आणि ते चीनला पाठवले जाते.