१. सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे
सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंग (Convex lens किंवा Magnifying lens) वापरता येते. हे भिंग प्रयोगशाळेच्या वस्तू मिळतात, त्या दुकानांमध्ये मिळू शकतेे. बहिर्गोल भिंगातून केंद्रीभूत होणारे सूर्यकिरण कापूस, नारळाचा काथ्या, वाळलेले गवत, वाळलेली पाने किंवा कागदाचे कपटे यांवर साधारणपणे १ ते ५ मिनिटे (हा कालावधी सूर्यकिरणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.) स्थिर केल्यास आरंभी धूर येतो आणि मग अग्नी प्रज्वलित होतो.
२. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे
‘चुलीवरील स्वयंपाक इत्यादी झाल्यावर चुलीतील निखार्यांवर थोडीशी राख टाकावी. त्यामुळे चुलीतील निखारे पूर्णपणे न विझता धुमसत रहातात. त्याच निखार्यांवर ३ – ४ घंट्यांनी कागद किंवा वाळलेली पाने घालून फुंकणीने फुंकर मारून अग्नी पुन्हा प्रज्वलित करावा.’ – श्री. अविनाश जाधव
३. गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे
‘लिंबाएवढ्या आकाराच्या दोन गारगोट्या एकमेकांवर घासून कापसावर ठिणग्या पाडाव्यात. यामुळेे कापूस पेटतो.’
– श्री. कोंडिबा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०१९)