१. घरी चूल नसली, तर पेठेतून मातीची, सीमेंटची किंवा बिडाची चूल खरेदी करून ठेवावी. काही उत्पादकांनी बनवलेल्या चुलीला धूर वर जाण्यासाठी ‘चिमणी’ची सोय असते.
२. चूल पेटवणे, प्रतिदिन तिची स्वच्छता करणे इत्यादी कृतीही शिकून घ्याव्यात.
३. चुलीसाठी जळणाची सोय करून ठेवावी लागेल.
४. ‘बायोमास ब्रिकेट’ मोठ्या शहरांतील दुकानांत, तसेच ‘ऑनलाईन’ विकत मिळतात.
५. लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड, साधी काडेपेटी, जलरोधक (वॉटरप्रूफ) काडेपेटी, अग्नि पेटवण्यासाठी चकमक (फायर स्ट्रायकर) इत्यादी वस्तूही घेऊन ठेवाव्यात.
६. चुलीवर वापरण्यासाठी तवा, कढई इत्यादी भांडी
७. सौरऊर्जेद्वारे (‘सोलर’द्वारे) पुरेशी वीजनिर्मिती करणारी यंत्रणा आहे, अशांनी विजेच्या साहाय्याने चालणारी उपकरणे घ्यावीत.
८. घरघंटी (पिठाची घरगुती चक्की) घेऊन ठेवावी.
९. चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.
१०. चुलीवर जेवण करायला शिकतांना ‘ओट्यावर स्वयंपाक करण्याची सवय’सुद्धा अल्प करण्याचा प्रयत्न करावा.
११. स्वयंपाकाला साहाय्यभूत होणारी सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे खरेदी करणेे
१२. ज्यांच्याकडे सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणारी यंत्रणा नाही, अशांनी सूर्यचुलीसारखी (सोलर कुकरसारखी) उपकरणे घेऊन ठेवावीत.
१३. ज्यांच्याकडे सौरऊर्जेद्वारे पुरेशी वीजनिर्मिती करणारी यंत्रणा आहे, अशांनी विजेच्या साहाय्याने अन्न शिजवणारी ‘इंडक्शन शेगडी’ आणि त्या शेगडीच्या संदर्भात उपयुक्त असणारी स्वयंपाकाची भांडी घेऊन ठेवावीत.