पुणे पोलिसांकडून अन्वेषण काढून अन्य पोलिसांकडे द्यावे ! – चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजप

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अद्यापही गुन्हा नोंद झालेला नाही. अन्वेषणासाठी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवे आहेत ? पोलिसांच्या अन्वेषणात संदिग्धता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून अन्वेषण काढून ते अन्य पोलिसांना द्यावे, अशी मागणी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. २५ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यूच्या प्रकरणाच्या अन्वेषणाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी अन्वेषणाविषयी असंतोष व्यक्त केला. पुणे पोलिसांनी आतापर्यंत अरुण राठोड याचे अन्वेषण केलेच नाही. त्याचे अन्वेषण केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे या वेळी चित्रा वाघ यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.