हिंदु महिला पतीकडून मिळालेल्या संपत्तीचा वाटा पित्याच्या कुटुंबातील लोकांना देऊ शकते ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  


नवी देहली – हिंदु महिला तिच्या संपत्तीचा वाटा तिच्या पित्याकडील नातेवाइकांना देऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करतांना दिला. यामुळे आता भाऊ, बहिण आणि अन्य नातावाइक यांना तिच्या संपत्तीचा उत्तराधिकारी मानला जाऊ शकतो.


या खटल्यामध्ये संबंधित महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती मिळाली होती. यानंतर तिने तिच्या भावाच्या मुलांच्या नावावर ही संपत्ती केली. याला तिच्या पतीच्या भावांनी विरोध करत न्यायालयात आव्हान दिले होते.