वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी सहभागी व्यक्तीने भाजपच्या नेत्याला चप्पल फेकून मारली !

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याऐवजी अशा प्रकारची कृती करणारे कायदाद्रोहीच होत !

विष्णुवर्धन रेड्डी यांनI चप्पल फेकून मारली.

अमरावती (आंध्रप्रदेश) – राज्यातील एका तेलुगु वृत्तवाहिनीवर एका विषयावरून अयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या वेळी अमरावती संवर्धन समितीचे सदस्य के. श्रीनिवास राव यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस एस्. विष्णुवर्धन रेड्डी यांना चप्पल फेकून मारली. विष्णुवर्धन रेड्डी यांनी के. श्रीनिवास राव यांचे तेलुगु देसम् पक्षाशी संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. रेड्डी वारंवार श्रीनिवार राव यांच्यावर यावरून आरोप करू लागले, तेव्हा राव यांनी संतापून चप्पल फेकून मारली. भाजपने या घटनेचा निषेध केला आहे.