गुरुदेवा तव चरणांशी आता मज एकरूप करवूनी घ्यावे ॥

२१.१.२०२१ या दिवशी झालेला श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
कु. प्रार्थना महेश पाठक

सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे ।
सारे ब्रह्मांडही गुरुदेवा तुमच्या चरणांशी ॥
घ्या इवल्याशा जिवा आता तव चरणांपाशी ॥ १ ॥

तव चरणांचीच लागू द्या आस ।
तव चरणांचाच लागू द्या ध्यास ॥
बनायचे आहे मला केवळ ।
तुमच्या चरणांचाच दास ॥ २ ॥

तव चरणांचे कधी न हो विस्मरण ।
सतत राहो गुरुचरण स्मरण ।
अखंड घडो मज सहवास गुरुचरणांचा ।
बनूनी तव चरणांचा धूलिकण ॥ ३ ॥

तव चरणांवर लीन होऊनी । भक्तीरसात दंग होऊनी ।
अस्तित्वही गुरुदेवा विसरूनी जावे ।
गुरुदेवा तव चरणांशी आता
मज एकरूप करवूनी घ्यावे ॥ ४ ॥

– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक