व्यक्तीचे नाव किंवा आडनाव यांचा अध्यात्मशास्त्रीयदृष्ट्या होणारा परिणाम

व्यक्तीचे नाव किंवा आडनाव यांचा तिच्यावर होणारा परिणाम आणि आध्यात्मिक पातळी, भाव आणि तळमळ या घटकांचा तिचे नाव किंवा आडनाव यांच्यावर होणारा परिणाम

प्रश्‍न : काही जणांची आडनावे सात्त्विक नसतात, उदा. अंधारे, कोथमिरे. त्यांनी नाव बदलणे योग्य होईल का ? बदलायचे असल्यास कोणते योग्य ? स्वतःच्या जातीतील चांगले आडनाव स्वीकारावे का ?

कु. मधुरा भोसले

उत्तर : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे एकत्रितरित्या कार्यरत असतात. व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांतून या घटकांचा परिणाम ५० टक्के पातळीपर्यंत होत असतो. हिंदु धर्म हा जातींवर आधारित नसून वर्णावर आधारित आहे. त्यामुळे व्यक्तीने तिच्या जातीप्रमाणे आडनाव लावण्यामागे कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक आधार नाही. व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा परिणाम तिची आध्यात्मिक पातळी, भाव आणि तळमळ या घटकांवर अवलंबून असतो. ५० टक्के पातळीच्या पुढे व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा तिच्यावर सूक्ष्म स्तरांवर होणारा परिणाम न्यून होऊ लागतो. ५० टक्के पातळीच्या पुढे व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा तिच्यावर सूक्ष्म स्तरांवर होणारा परिणाम ५० टक्क्यांपेक्षा न्यून होतो आणि ७० टक्के पातळीनंतर हा परिणाम ० टक्के इतका होतो. त्यामुळे प.पू. झुरळे महाराज, प.पू. ढेकणे महाराज यांच्यासारख्या संतांच्या आडनावांचा त्यांच्यावर लेषमात्रही परिणाम झाला नाही. आध्यात्मिक पातळी ५० टक्के पेक्षा न्यून असणार्‍या व्यक्तीचे नाव किंवा आडनाव सात्त्विक नसेल, तर तिच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वत:चे नाव किंवा आडनाव पालटून सात्त्विक नाव किंवा आडनाव ठेवावे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या व्यक्तींनी त्यांचे नाव किंवा आडनाव पालटण्यापेक्षा धर्माचरण आणि व्यष्टी, तसेच समष्टी साधना मनापासून, भावपूर्ण आणि तळमळीने करण्यावर भर देणे अधिक योग्य आहे.’

३० टक्के पातळीपर्यंत नाव बदलले, तरी लाभ होत नाही; कारण मन मायेतच गुंतलेले असते. ३० ते ६० टक्के पातळीपर्यंत नावाचा परिणाम कमी कमी होत जातो. ७० टक्के पातळीच्या पुढे नाव कोणतेही असले, तरी त्याचा व्यक्तीवर (संतांवर) परिणाम होत नाही.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२०, रात्री १०.३०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक