‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वतःमध्ये अभेद आहे’, असे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांनी सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वतःमध्ये अभेद आहे’, असे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांनी सांगणे अन् त्यासंदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण

पू. सौरभ जोशी

१. पू. सौरभ जोशी यांनी ‘अभेद’ हा शब्द उच्चारणे

​‘२२.१०.२०२० या दिवशी सकाळी पू. सौरभदादा यांनी अंघोळीच्या वेळी ‘अभेद’ हा शब्द उच्चारला. त्यांनी हा शब्द प्रथमच उच्चारल्याने मला त्याचे आश्‍चर्य वाटले. त्या वेळी झालेले संभाषण येथे दिले आहे.

मी : पू. दादा, ‘अभेद’, म्हणजे भेद नाही, म्हणजे ‘एकच आहे’, असा अर्थ होतो.

पू. दादा : हो.

मी : तुम्ही आणि श्री (पू. सौरभदादा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्री’ असे संबोधतात.) यांच्यात ‘अभेद’ आहे का ?

पू. दादा : हो.

मी : श्री आणि श्रीकृष्ण यांच्यात अभेद आहे का ?

पू. दादा : हो.

मी : श्रीकृष्ण आणि तुमच्यात अभेद आहे का ?

​पू. सौरभदादा या प्रश्‍नावर काही बोलले नाही. ते गालातल्या गालात हसले. मी हा प्रसंग पू. संदीप आळशी यांना सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘पू. सौरभदादांचे योग्य आहे. शिष्य गुरूंशी एकरूप होतो. गुरुंमुळेच शिष्याला देवाची ओळख होते.’’

सौ. प्राजक्ता जोशी

२. सौ. प्राजक्ता जोशी (पू.सौरभ यांची आई) यांनी या घटनेचे केलेले ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. अश्‍विन शुक्ल पक्ष सप्तमी तिथीचे महत्त्व !

१. २२.१०.२०२० या दिवशी अश्‍विन शुक्ल पक्ष सप्तमी ही तिथी होती.

२. या दिवशी सरस्वतीपूजन करतात.

३. या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करतात.

४. या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते.

५. योगसाधनेत आज्ञाचक्रापर्यंत साधना होणे महत्त्वाचे असते.

२ आ. आज्ञाचक्रापर्यंत प्रगती झालेल्या पू. सौरभदादांच्या मुखातून प्रत्यक्ष देवीने ‘अभेद (भेद नाही)’, असे वदवले.

पू. सौरभदादांना नवरात्रीच्या काळात देवीने दर्शन देऊन त्यांच्या मुखातून नवीन शब्द उच्चारून घेतला. त्यामुळे ‘त्यांच्या जीभेवर देवी सरस्वतीचा वास आहे’, असे मला जाणवले.

३. अंकशास्त्रानुसार २२.१०.२०२० या दिवसाचे महत्त्व !

अ. २२ या संख्येत २ वेळा २ हा अंक आहे.

आ. २ हा अंक चंद्र ग्रहाशी संबंधित आहे.

इ. चंद्र ग्रह मातेचा कारक ग्रह आहे.

ई. साक्षात् देवी सरस्वतीच्या कृपेने पू. सौरभदादा लवकरच सर्व बोलू लागतील.

उ. २२.१०.२०२० या दिवसाची एक अंकी बेरीज ९ येते. ९ हा अंक पूर्णत्व दर्शवतो.

ऊ. देवीमातेच्या कृपेने पू. सौरभदादांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे लवकरच प्रसिद्ध होईल.

४. पू. सौरभदादांची साधनेतील उच्च स्थिती दर्शवणारा २२.१०.२०२० हा दिवस !

​२२.१०.२०२० या दिवशी धनु ही गुरुतत्त्वाची रास पू. सौरभदादांच्या चंद्र कुंडलीनुसार मोक्षस्थानात आहे. या दिवशी घबाड मुहूर्त होता. चंद्र-गुरु युती, म्हणजे ‘गजकेशरी योग’ मोक्षस्थानात, म्हणजे साधनेची उच्च स्थिती दर्शवतो. या दिवशी ‘पू. सौरभदादांच्या उत्तराषाढा या जन्म नक्षत्रात, मकर राशीत शनी ग्रह स्वराशीत असणे’, हे पू. सौरभदादांची साधनेतील उच्च स्थिती दर्शवणारी आहे.’

– श्री. संजय जोशी (पू. सौरभ यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२०)


श्री. संजय जोशी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. सौरभ जोशी दोघेही आनंदस्वरूप असल्याने ते एकच आहेत !’ – प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. श्रीधर दास, उडुपी (कर्नाटक)

१. उडुपी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. श्रीधर दास यांनी रामनाथी आश्रमाला भेट देणे

​‘उडुपी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. श्रीधर दास यांनी गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांची पू. सौरभ जोशी यांच्याशी भेट झाली.

२. पू. सौरभदादा यांनी ते आणि परात्पर गुरु डॉ. आठवले  या दोघांत अभेद असल्याचे डॉ. श्रीधर दास यांना सांगितल्यावर ‘ते दोघे आनंदस्वरूप असल्यामुळे एकच आहेत’, असे डॉ. श्रीधर दास यांनी सांगणे

​काही दिवसांपूर्वी ‘पू. सौरभदादा (पू. सौरभ जोशी) यांनी ‘अभेद’, असा शब्द उच्चारून त्यांच्यामध्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात ‘अभेद’ असल्याचे, म्हणजे भेद नसल्याचे सांगितले होते. तो प्रसंग मी डॉ. श्रीधर दास यांना सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘पू. सौरभदादा आनंदस्वरूप आहेत. त्यांच्या सान्निध्यात जो येतो, त्याला आनंद होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले हेही आनंदस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात जो येतो, त्याला आनंद होतो. याचा अर्थ पू. सौरभदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले दोघेही आनंदस्वरूप आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत, असा होतो.’

– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक