बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सध्या घरोघरी सकाळी चहा समवेत बिस्किटे खायला बहुतेक सर्वांनाच आवडते. पेठेत (बाजारांत) विविध आस्थापनांची बिस्किटे आकर्षक वेष्टनांत विक्रीसाठी ठेवलेली आढळतात. आजकाल मुलांनाही बाहेरील पदार्थ खाण्याची सवय झाल्याने ते बिस्किटांसाठी हट्ट करतात. पालकांनाही ते सोयीचे असल्याने ते लगेच मुलांचा हट्ट पुरवतात. ‘बिस्किटे खाल्ल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432878.html


१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली ६६ टक्के पातळीची साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला ६१ टक्के पातळीचा साधक असे एकूण ४ साधक सहभागी झाले होते. या चाचणीत एकूण २ प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात साधकांना बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे (प्रत्येकी २ बिस्किटे) खाण्यास दिली, तर दुसर्‍या प्रयोगात त्यांना सनातनच्या आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली (प्रत्येकी २ बिस्किटे) खाण्यास दिली. दोन्ही प्रयोगांमध्ये साधकांनी बिस्किटे खाण्यापूर्वी, तसेच खाल्ल्यानंतर २० मिनिटांनी त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर दोन्ही प्रकारची बिस्किटे खाल्ल्याने साधकांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने साधकांवर नकारात्मक परिणाम, तर आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.


या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. बाहेरील बेकरीत बनवलेल्या बिस्किटांमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.

२. आश्रमातील बेकरीत बनवलेल्या बिस्किटांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

३. साधकांनी बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

४. साधकांनी आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने चाचणीतील सर्व साधकांवर नकारात्मक परिणाम, तर आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने त्यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने साधकांतील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होण्याचे कारण : बाहेरील बेकरीत बनवलेल्या बिस्किटांमध्ये पुष्कळ नकारात्मक स्पंदने आढळली. ही बिस्किटे खाल्ल्याने साधकांभोवतीच्या नकारात्मक आवरणात वाढ झाली आणि त्यांच्यातील सात्त्विकता न्यून झाली. बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने साधकांना आध्यात्मिक स्तरावर हानी झाली. नकारात्मक स्पंदनांनी भारीत बिस्किटे खाणे आरोग्याचा दृष्टीनेही घातक आहे.

३ आ. आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाल्ल्याने साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होण्याचे कारण : सनातनच्या आश्रमात पुष्कळ सात्त्विकता आहे. आश्रमात प्रत्येक कृती ‘साधना’ म्हणून केली जाते. आश्रमातील बेकरीत साधकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते, उदा. बेकरी स्वच्छ ठेवणे, पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक वस्तू आणि घटक यांची व्यवस्थित मांडणी करणे, यंत्रांचा उपयोग करतांना तेथील वातावरणातील सात्त्विकता टिकून रहावी, यासाठी हळू आवाजात संतांची भजने किंवा नामजप लावून ठेवणे, बेकरीची नियमित शुद्धी करणे इत्यादी. सेवा करतांना परिपूर्ण नियोजन करून त्या केल्या जात असल्याने तेथे सेवा करतांना शांत वातावरण असते. बेकरीत सेवा करणारे साधक प्रत्येक कृती करतांना नामजप करत सेवाभावाने करतात. एकंदरित बेकरीतील वातावरण, तसेच संबंधित सर्व घटक सात्त्विक असल्याने तेथे बनणारे पदार्थ सात्त्विकतेने भारीत होतात. यामुळे आश्रमातील बेकरीत बनवलेल्या बिस्किटांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळली. ही बिस्किटे खाल्ल्याने साधकांना त्यातील सात्त्विक स्पंदनांचा लाभ झाल्याने त्यांच्या भोवतीचे नकारात्मकतेचे आवरण पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली.

थोडक्यात बाहेरील बेकरीत बनवलेली आणि आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ भेद आहे. वैज्ञानिक चाचणीच्या निष्कर्षातून ‘बाहेरील बेकरीत बनवलेली बिस्किटे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे’, हे सिद्ध होते.

४. बाहेरील बिस्किटे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याने ते खाणे टाळा !

बिस्किटांमध्ये अधिकतर मैद्याचा, तसेच कृत्रिम घटकांचा (इसेन्सचा/ अर्क किंवा सुगंध यांचा) उपयोग केला जातो. बिस्किटे हा पदार्थ विजेवर चालणार्‍या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने बनवला जातो. यावर अग्नीचा संस्कार होत नाही. यामुळे बिस्किटे पचायला जड असतात. आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने बनवलेल्या पदार्थांतील सात्त्विकता लोप पावते. याचे कारण हे की, यंत्रातून निर्माण होणार्‍या असात्त्विक नादाकडे वातावरणातील वाईट शक्ती लगेच आकृष्ट होतात. त्यामुळे हे पदार्थ लगेच दूषित होतात. दूषित पदार्थ खाल्ल्याने खाणार्‍याला त्रास होतो. थोडक्यात बाहेरील बिस्किटे खाणे टाळून घरी बनवलेले ताजे आणि सकस पदार्थ खाणे कधीही श्रेयस्कर !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१२.१२.२०२०)

ई-मेल : [email protected]

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक