सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘हे गुरुराया, ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत असतांना तुमच्या सान्निध्यातील आठवणींत माझे मन रममाण झाले. त्या आठवणींमुळे माझ्याभोवती चैतन्याचा स्रोत निर्माण झाला आणि या चैतन्याच्या स्रोतात असतांनाच मला पुढील ओळी सुचल्या. मी त्या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) चरणी अर्पण करत आहे.
हे गुरुराया, त्रिभुवनात तुम्ही एकमेव आहात गुरु परमेश्वर ।
कलियुगातील हा तुमचा अवतार देतो आम्हास परमानंद ।। १ ।।
द्वापरात श्रीकृष्णावतार घेऊन तुम्ही गीता सांगितली अर्जुनाला ।
या गीतेच्या बोधामृतातून मानवी जन्माचा मार्ग सुकर झाला ।। २ ।।
द्वापरातील हा श्रीकृष्णावतार त्रिभुवनात महान ठरला ।
‘जगद्गुरु’ या चैतन्यमय उपाधीने तो नावलौकिकास आला ।। ३ ।।
कलियुगातील ‘जयंत’ अवतारात तुम्ही ‘गुरुकृपायोग’ सांगितला ।
अन् विहंगम मार्गाने मानवजातीसाठी मोक्षाचा पथ सुकर केला ।। ४ ।।
द्वापरातील हे जगद्गुरु कलियुगात ‘मोक्षगुरु’ झाले ।
मानवकल्याणास्तव जन्म घेण्याचे ध्येय त्यांनी पूर्णत्वास नेले ।। ५ ।।
कलियुगातील मानवास दोष-अहं मुक्त जीवनाचे बोधामृत दिधले ।।
मानवजन्माचे कल्याण करण्याचे गुपितही तुम्हीच उलगडले ।। ६ ।।
हे नारायणस्वरूप गुरुराया, प्रत्येक युगात तुम्ही जन्म घेता ।
मानवाचे कल्याण करून जिवाचा मोक्षमार्ग सुकर करता ।। ७ ।।
नतमस्तक आम्ही सारे जीव तव चरणा अन् करतो प्रार्थना ।
‘लाभो तव चरणी स्थान’, हीच आस बाळगतो मम मना ।। ८ ।।’
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |