बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

तृणमूल काँग्रेसने भाजपचा दगडफेकीचा आरोप फेटाळला !

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील कांडी भागामध्ये भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर आक्रमण करण्यात आले. घोष ब्रह्मपूर येथे जात असतांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक केली, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. या आक्रमणात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. एका चारचाकी गाडीचा आरसा तुटला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे.