गोवा काँग्रेसकडून पक्षातील अल्पसंख्यांक गटाचे माजी अध्यक्ष इर्फान मुल्ला यांचे सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित

पणजी – गोवा काँग्रेसने पक्षातील अल्पसंख्यांक गटाचे माजी अध्यक्ष आणि माजी प्रवक्ते इर्फान मुल्ला यांचे सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित केले आहे. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुल्ला यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकजूट नाही आणि कुणीही अल्पसंख्यांकांच्या समस्यांची नोंद घेत नाही, असे विधान करून १५ नोव्हेंबरला त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले होते. याविषयी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून कळवले होते. (हे आहे काँग्रेसमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही ! – संपादक)