स्वधर्माचरणापासून दूर नेणारे आणि अन्य पंथियांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर !

ख्रिस्ती किंवा इस्लामी धर्मप्रचारकांकडून केला जाणारा धर्मांतराचा प्रयत्न वेळीच रोखणे आवश्यक !

भारत आणि हिंदु धर्म यांवर काही शतकांपासून होत असलेले परधर्मियांचे धार्मिक आक्रमण म्हणजे धर्मांतराची समस्या ! इतिहासात अरबांपासून इंग्रजांपर्यंत अनेक परकियांनी भारतावर आक्रमणे केली. साम्राज्यविस्तारासह स्वधर्माचा प्रसार हाच या सर्व आक्रमणांचा गाभा होता. आजही या परकियांचे वारस तेच ध्येय ठेवून भारतात नियोजनबद्धरित्या कार्यरत आहेत. मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहेत, तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहेत आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य झालेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येेने बळी पडत आहे.

‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।’, म्हणजे ‘स्वधर्म पाळतांना मृत्यू आला, तरी परधर्म स्वीकारण्यापेक्षा तो मृत्यू श्रेयस्कर आहे’, असे तत्त्व श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. ‘पाण्यात रहाणारा मासा तुपात गेला, तरी त्याचे मरण निश्‍चित असते, तसेच स्वधर्म सोडून परधर्मात जाणे, म्हणजे मरण ओढवून घेणे होय’, हे हिंदूंनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

हिंदूंचा वंशनाश होण्याचा धोका !

‘हिंदूंचे धर्मांतर वेगाने होत राहिले, तर १०० वर्षांनी ‘पारशी पंथ होता’, असे ज्याप्रमाणे आता म्हणतात, त्याप्रमाणे ‘हिंदु धर्म होता’, असे म्हणायची पाळी येईल; कारण धर्मांतरामुळे हिंदू जेव्हा राष्ट्रात अल्पसंख्यांक होतील, तेव्हा त्यांना ‘काफीर’ म्हणून ठार केले जाईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था    

भारताचे ख्रिस्तीकरण

हा ख्रिस्ती धर्मियांचा धर्मांतर घडवण्यामागील मूळ हेतू आहे. यासाठीच भारतात ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च कार्यरत आहेत.

१. पोप जॉन पॉल दुसरे : ‘पहिल्या सहस्रकात युरोपात ख्रिस्ती पंथ रुजला. दुसर्‍या सहस्रकात तो अमेरिका अन् आफ्रिका या खंडांत पसरला. तिसर्‍या सहस्रकात उर्वरित जगात आणि भारतात ख्रिस्ती पंथ रुजावा’, अशी आपण प्रार्थना करूया.’ – पोप जॉन पॉल दुसरे (वर्ष १९९९ मध्ये भारतीय दौर्‍यात काढलेले उद्गार)

२. मदर तेरेसा : ‘धर्मांतर करणे, हा ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यप्रणालीतील प्राण आहे. तो काढून घेतल्यास मिशनरी मृतवत् होतील.’ – मदर तेरेसा (अशा दृष्टीकोनातून भारतात सेवाकार्य करणार्‍या मदर तेरेसा यांना निधर्मी शासनाने ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला, हे लक्षात ठेवा !)

३. फादर जॉन्सन : ‘आम्हा पाश्‍चात्त्यांवर जगाला ख्रिस्ती करण्याचे दडपण असते. ‘ख्रिस्ती धर्म न मानणारे नरकात जाणार’, असे आम्ही मानत असल्याने ख्रिस्ताचा संदेश सर्वदूर पोचवत असतो. ‘सर्व धर्म एकसमान आहेत’, असे हिंदू समजतात; म्हणून भारत धर्मांतरासाठी योग्य देश आहे.’ – फादर जॉन्सन

भारताचे इस्लामीकरण

‘दारूल इस्लाम’ (इस्लामी राष्ट्रांचे जग) आणि ‘दारूल हरब’ (इस्लामेतर राष्ट्रांचे जग) अशी मानवजातीची विभागणी इस्लामने केली आहे. ‘दारूल हरब’चे संपूर्ण इस्लामीकरण अर्थात् ‘दारूल इस्लाम’ होईपर्यंत ‘जिहाद’ म्हणजे धर्मयुद्ध करण्याची इस्लामची शिकवण आहे.’

‘धर्मांतर हा प्रकारही इस्लामच्या दृष्टीने एकप्रकारचा जिहादच आहे. ‘दारूल-हरब’ असलेल्या भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीच गेल्या १ सहस्र ३०० वर्षांपासून तलवार, बंदूक, खोटे प्रेम (लव्ह जिहाद) आदी माध्यमांतून हिंदूंचे धर्मांतर करणे चालू आहे.’ – साप्ताहिक ‘वज्रधारी’ (१७.२.२०११)

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात हिंदू धर्माचरण करणारे असल्याने हिंदूंच्या धर्मांतरावर बंदी असेल !

भारतात प्रचलित लोकशाही व्यवस्थेत धर्मांतराच्या विरोधात कडक दंडविधान करण्याची मागणी करावी लागत असली, तरी स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर करण्याला प्रतिबंध करणारे दंडविधान (कायदा) असेल. हिंदूंच्या लोकसंख्येत होणारी घट, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, धर्मांतरित हिंदूंनी आध्यात्मिक उन्नतीला मुकणे ही सूत्रे लक्षात घेऊन नवीन दंडविधानानुसार हिंदूंच्या धर्मांतरावर पूर्णतः बंदी असेल. धर्मांतरितांना हिंदु धर्मात पुनप्रर्र्वेश घेण्याची, तसेच अहिंदूंना शीघ्र आध्यात्मिक प्रगतीच्या हेतूने हिंदु धर्म स्वीकारण्याची सवलत देण्यात येईल. हिंदु राष्ट्रात हिंदू धर्माचरण करत असल्याने धर्मांतरबंदी असेल !

हिंदूंनो, धर्मांतर करून स्वधर्माचा दैदिप्यमान इतिहास कलंकित करू नका !

इतिहासात मानवता, संस्कृती आणि नैतिकता यांसाठी हिंदु समाजाने दिशाहीन उद्रेक केला जातो; परंतु निश्‍चित स्वरूपाचा तोडगा काढला जात नाही. मूळ प्रश्‍नाचे आकलन करून घेणे, सत्ताधार्‍यांवर दबाव आणून परकीय साहाय्य थांबवणे, धर्मांतरासंबंधात अन्य राष्ट्रांनी अवलंबलेल्या धोरणांचा अभ्यास करणे आणि मतांचे गणित न मांडता धर्मांतर रोखणे आदी गोष्टी हिंदु संघटनांकडून अपेक्षित आहेत. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण (भाग १))