मनाचा आहार
चांगले विचार हे मनाचे टॉनिक आहे. वाईट विचार किवा भावनोद्रेकाने मन अस्वस्थ होते. ध्यानाने मन निर्विचार होऊन शांत होते.
बुद्धीचा आहार
बुद्धी वाढवण्यासाठी बुद्धीचे नेमके खाद्य कोणते ? सतत अभ्यास करणे, तज्ञांशी चर्चा करणे, दुसर्यांच्या तंत्रांचा अभ्यास करणे आणि त्या विषयातील तज्ञ अन् गुरु यांची सेवा करणे हे बुद्धीचे खाद्य आहे.
अहंकाराचा आहार
जितका अहंकार अधिक, तितके आयुष्य दुःखमय होते. धन, पद, विद्या, बल, रूप इत्यादींनी अहंकार वाढतो, म्हणजेच या गोष्टी अहंकाराचे खाद्य आहेत.
आत्म्याचा आहार
आत्मा सच्चिदानंदरूप असल्याने त्याला आहाराची आवश्यकता नसते. उलट त्याच्या अस्तित्वानेच जिवाला चैतन्य मिळून कार्य होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – अन्नपदार्थांचे औषधी गुणधर्म (भाग २))