विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

कोलकाता – भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात पोलंड येथील एक नागरिक सहभागी झाला होता. त्यामुळे त्याला भारत सोडून जाण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्याविरोधात न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देतांना न्यायालयाने ही नोटीस रहित करून वरील निर्णय दिला.