भारतातील ७७ टक्के मुलींवर लैंगिक अत्याचार ! – युनिसेफ

धर्मशिक्षणाला पर्याय नाही !

भारतामध्ये १५ ते १९ वर्षे  वयोगटातील ७७ टक्के मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, अशी माहिती ‘दी युएन् चिल्ड्रेन्स फंड’ने (युनिसेफने) ‘हीडन इन प्लेन साईट’ या शीर्षकाच्या अहवालात दिली आहे.

१. वरीलपैकी ५० टक्के मुलींवर नातेवाइकांकडून लैंगिक अत्याचार होतात.

३. भारतात १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३४ टक्के मुलींवर पती आणि मित्र यांच्याकडून अत्याचार होतात.

४. १५ वर्षांच्या आतील २१ टक्के मुली लैंगिक अत्याचाराला सामोर्‍या जातात.

५. विवाहानंतरही काही मुलींना त्यांचे प्रियकर अनेकदा त्रास देत असतात.

६. नातेवाइक, मित्र आणि शिक्षक यांच्याकडूनच सर्वांधिक अत्याचार होतात.

७. भारतामध्ये २०१२ मध्ये ९ सहस्र ४०० युवकांचे अत्याचाराच्या प्रकरणातून खून झाले आहेत, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.