पॅरिस – कोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत. युरोपातील ३४ देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ आहे. कोलंबिया २४ मार्चपासून, तर न्यूझीलंड २५ मार्चपासून पूर्ण बंद होणार आहे. जगभरात आतापर्यंत ३ लाख ८१ सहस्र ५९८ नागरिक कोरोनाबाधित आहेत. यांपैकी १ लाख जणांवर उपचार करून त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तर १६ सहस्र ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये आतापर्यंत ६ सहस्र ७७ जणांचा मृत्यू
रोम – इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ सहस्र ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे २२ मार्चला ६५१, तर २३ मार्चला ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ सहस्र ७८९ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या २ दिवसांत संसर्गाचा आकडा न्यून होत आहे, अशी माहिती इटलीतील एका वैद्यकीय अधिकार्याने दिली.