संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप

मुंबई – कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला; मात्र राज्यातील विविध शहरांत नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणार्‍यांना काही ठिकाणी पोलिसांनी चोप दिला. काही शहरांत नागरिकांनी पोलिसांसाठी चहा आणि अल्पाहार यांची व्यवस्था केली.