देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

९ जणांचा मृत्यू

नवी देहली – देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०७ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आतापर्यंत देशातील ३१ राज्यांनी दळणवळणावर बंदी (लॉकडाऊन) घोषित केली आहे. याचसमवेत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ३४ जणांवर केलेले उपचार यशस्वी झाले आहेत.