रामजन्मभूमीविषयी निकाल देणार्‍या न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ

नवी देहली – रामजन्मभूमीविषयी निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दक्षतेचा एक भाग म्हणून या न्यायमूर्तींच्या निवासस्थानी अतिरिक्त बळ तैनात करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यांवर ‘बॅरिकेड्स’ उभारण्यात आले आहेत. यापूर्वी या न्यायमूर्तींच्या घरी सुरक्षारक्षक आणि स्थिर सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित होती. आता न्यायमूर्तींच्या वाहनासमवेत सशस्त्र पोलिसांसह संरक्षक वाहन समवेत राहील, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.