
जयपूर (राजस्थान) – जोधपूर येथील उम्मेद रुग्णालयात बाळंतपणानंतर एका २४ वर्षीय महिलेला चुकीच्या रक्तगटाचे रक्त दिल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. महिलेचे नाव धापू भील असे असून ती जोधपूर जिल्ह्यातील डावरा बावडी गावची रहिवासी आहे. या घटनेच्या दुसर्या दिवशी महिलेची प्रकृती खालावल्याने तिला १३ जुलै या दिवशी महात्मा गांधी रुग्णालयात अतीदक्षता विभागामध्ये हालवण्यात आले. ‘एस्.एन्. मेडिकल कॉलेज’चे प्राचार्य बी.एस्. जोधा यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
🚨 Wrong Blood, Life at Risk!
Medical negligence cannot be brushed aside.
In Rajasthan's Jodhpur, a postpartum woman is battling for her life after allegedly being transfused with B+ blood instead of the required O+ blood. Authorities have ordered an inquiry.
This is not an… pic.twitter.com/gG5KsrS6wF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2026
१. धापू भील हिने ११ जुलै या दिवशी एका मुलाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर ॲनिमिया (रक्तातील तांबड्या पेशींची कमरतता) आणि इतर समस्या यांमुळे तिला त्याच दिवशी उम्मेद रुग्णालयात हालवण्यात आले होते. तिथे तिला तिचे मूळ रक्त ‘ओ-पॉझिटिव्ह’ देण्यात आले; मात्र १२ जुलैच्या रात्री तिला पुन्हा रक्त चढवण्यात आले असता तिला चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त देण्यात आले.
२. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीमुसार रक्त चढवल्यानंतर तिला हुडहुडी भरली. त्यानंतर तिच्या युरिनच्या पिशवीत रक्त दिसू लागले, जे चुकीचे रक्त दिल्याचे लक्षण होते. तिची प्रकृती वेगाने खालावली, ज्यामुळे किडनी निकामी झाली. ‘तिला लघवीला होणे बंद झाले आणि रक्तस्राव झाला’, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर तिला महात्मा गांधी रुग्णालयात नेऊन अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले.
३. महिलेचा पती किशनाराम यांनी आरोप केला आहे की, रुग्णालयाने त्यांना धापू हिला महात्मा गांधी रुग्णालयात का हालवले जात आहे ?, याचे कारण सांगितले नाही. तिला चुकीचे रक्त दिल्याची माहितीही लपवून ठेवण्यात आली.
२ रुग्ण महिलांची नावे सारखीच असल्यामुळे गोंधळ
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या २ महिलांची नावे सारखीच होती आणि त्यांच्या पतींची नावेही एकसारखीच होती. एका महिलेचा रक्तगट बी-पॉझिटिव्ह होता, ज्यामुळे रक्त देतांना कर्मचार्यांकडून हा गोंधळ झाला असावा.
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !