वाढते घटस्फोट चिंताजनक !

भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !

आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.

भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख !

राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही.

संपादकीय : वैज्ञानिकांना चपराक !

वासुकी सापाचे सापडलेले जीवाश्म म्हणजे पुराणांना थोतांड मानणार्‍यांना मिळालेली चपराकच !

श्रीरामावतार, शरयू नदी आणि अयोध्यानगरी

‘अयोध्यानगरी हिंदूंच्या प्राचीन सप्तपुरींपैकी एक आहे. या नगरीतील ऐश्वर्याची तुलना स्वर्गलो काशी केलेली आहे. ‘अथर्ववेदा’त या नगरीला ‘ईशपुरी’ म्हटले आहे. प्रभु रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगात झाला. सध्याची अयोध्यानगरी विक्रमादित्याने २००० वर्षांपूर्वी पुन्हा वसवली.

मंदिरांचे रचनाशास्त्र !

भारतातील अद्वितीय मंदिरे विशेषांकार्गत मंदिरांच्या रचंनाशास्त्रांच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती येथे देत आहे.

प्राचीन भारतीय मंदिरे : मानवी जीवनाचा केंद्रबिंदू !

कित्येक सहस्र वर्षे हिंदु संस्कृतीचे जतन करण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या, तसेच विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक स्वास्थ्य जोपासणार्‍या देवालयांच्या वास्तूशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सामाजिक जीवनात अवतरण करणे, हेच आजच्या युगातील शास्त्रज्ञांना आव्हान आहे !

हिंदूंच्या मंदिर स्थापत्यशास्त्रातील ध्वनीशास्त्र !

दिराच्या बांधकामासाठी तबल्यासारखा आवाज देणारे दगड निवडत असत. विशिष्ट मंत्रांचा उच्चार वर्तुळाकार ध्वनी आणि प्रतिध्वनी यांच्या रूपाने मंत्रयुक्त वातावरण निर्माण करत असतो. घंटेचा नाद वर्तुळाकार फिरतो. अशा वर्तुळाकार ध्वनीच्या वातावरणात मनात विचार येणे बंद होते.

नादशास्त्रावर आधारलेले देवालयाचे स्तंभ !

कन्याकुमारीच्या देवालयात एका बाजूला सप्तस्वरांचे दगडी स्तंभ आहेत, तर दुसर्‍या बाजूला मृदुंगाचे ध्वनी स्तंभात बसवलेले आहेत. दगडाचा नाद विशिष्ट स्वरातच यावा, यासाठी याचा परीघ केवढा घ्यावा लागेल, दगडाला आतून किती पोकळ करावे लागेल, याचे बिनचूक गणित आणि शास्त्र त्यामागे आहे.

प्राचीन मंदिरांतील मूर्तींची वैशिष्ट्ये !

भारतातील प्राचीन मंदिरे ही अंगभूत वैज्ञानिक उन्नतीचे प्रदर्शक आहेत. असे एकही प्राचीन मंदिर नाही की, ज्यात प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगती प्रतीत करणारे उदाहरण नाही.