कन्याकुमारीच्या देवालयात एका बाजूला सप्तस्वरांचे दगडी स्तंभ आहेत, तर दुसर्या बाजूला मृदुंगाचे ध्वनी स्तंभात बसवलेले आहेत. दगडाचा नाद विशिष्ट स्वरातच यावा, यासाठी याचा परीघ केवढा घ्यावा लागेल, दगडाला आतून किती पोकळ करावे लागेल, याचे बिनचूक गणित आणि शास्त्र त्यामागे आहे. श्री. श्री.म. माटे म्हणतात, ‘जर या स्थापत्यांनी आणि शिल्पकारांनी या पाठीमागील शास्त्रीय तत्त्वे कोणती आहेत, ते स्पष्ट केले असते, तर बरे झाले असते. म्हणजे पिढ्यानपिढ्या तो ‘दैवी चमत्कार’ या नात्याने त्याकडे न पहाता समाजाला निर्मळ वैज्ञानिक दृष्टी आली असती.
शिव-देवालयाचे वैशिष्ट्य : शिव-देवालयाची रचना नैसर्गिकरीतीने वायू-निबद्ध (एअर कंडिशनिंग) केलेली आढळते. देवालयातील गाभारा खोल भूमीत निर्माण केलेला असतो. गाभार्याचे दार लहान असते. त्यात पायर्या उतरून जावे लागते. त्यामुळे तळपत्या उन्हात जरी शिवाच्या देवालयात गेले, तरी गार वाटते. ‘गाभार्यात प्रणवाच्या नादलहरी निर्माण करून त्या नादवलयात आपण रहावे’, अशी योगशास्त्रास धरून रचना केलेली आढळते. ध्वनीलहरींचे आघात विषम, विस्कळीत पडले, तर ज्ञानतंतूंवर विपरित परिणाम होतात. शिव-देवालयांची रचनाच अशी असते की, येथे लयबद्ध, सुरेल आणि कोमल ध्वनीलहरी निर्माण होतात, ज्या ज्ञानतंतूंना सुसंवादी, तसेच उत्तेजित करतात.
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
मंदिरात श्वासाचा आवाज मोठ्याने घुमणे
‘तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलो. तिथे दर्शन घेतांना काहीही झाले नाही; पण दर्शन घेऊन परत येतांना एक नाकपुडी दाबून जोरात श्वासोच्छ्वास घेतला, त्या वेळी पूर्ण मंदिरात त्या श्वासाचा आवाज घुमू लागला. दर्शनाला येणारे सर्व लोक त्या आवाजाने आश्चर्यचकित झाले.’
– श्री. शि.ना. कुलकर्णी, संभाजीनगर (औरंगाबाद)