प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

‘आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे. आज सर्व बाजूंनी सर्व क्षेत्रांतून सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धा ढासळून टाकण्याचा आटोकाट यत्न होतो आहे. स्वतः विचारवंत म्हणवणारे असे राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महाराष्ट्राचे लोकहितवादी फुले, आगरकर, भांडारकर, तेलंग; आर्य आक्रमणाचा सिद्धांत प्रस्थापित करून वसाहतवादी मिशनरी मॉडेल (कोलेनियल मिशनरी मॉडेल) करू पहाणारे मेकॉले, मॅक्समुलर, मोहोंजोदारोवरचा वर्ष १९३० मधील बॅनर्जीचा अहवाल दडवून टाकणारा सर जॉन मार्शल अशा असंख्य स्वतःला शहाणे म्हणवणार्यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्कृती अशी अनेक थोतांडे उभी करून आम्हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धाच मोडून टाकण्याकरता कंबर बांधली. असा हा देश, ही आमची पुण्यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२३)
स्वामी विवेकानंद यांचे विचारधन
आजच्या वृत्तपत्रांची स्थिती
हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !