स्वाईन फ्ल्यू’चा आजार पसरू नये, यासाठी काय करावे ?

संसर्गजन्य आजार असल्याने शक्यतो हा आजार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी केवळ स्वत:पुरती मर्यादित नसावी. आपल्या शरिरात आजाराचे विषाणू असतील, तर आपल्यामुळे इतरांना त्याची लागण होऊ नये, ही दक्षता घेणेही आवश्यक आहे.

मंकीपॉक्सचा भारतात पहिला बळी !

केरळचा २२ वर्षीय तरुण हा ‘मंकीपॉक्स’ या आजाराचा भारतातील पहिला बळी ठरला आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे जाऊन आला होता. तेथेच त्याला याची लागण झाली होती.

जगातील ११० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !

फ्रान्समध्ये प्रत्येक चार जणांपैकी एकजण बहिरा ! – संशोधनाचा निष्कर्ष

फ्रान्समध्ये नुकतेच १८ ते ७५ वर्षे वयोगटांतील २ लाख लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ‘फ्रान्समध्ये चार जणांपैकी एकजण बहिरा आहे किंवा त्याला अल्प प्रमाणात ऐकायला येते’, असे दिसून आले.

भारतात ‘लघू कोरोना लाट’ येण्याची शक्यता ! – जागतिक आरोग्य संघटना

देशात ९ जून या दिवशी ७ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. असेही होऊ शकते की, प्रत्येक ४-६ मासांच्या अंतराने ‘लघू कोरोना लाट’ पहायला मिळू शकते.

कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

गेब्रेयसस पुढे म्हणाले, ‘‘जगातील ७० देशांमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या सर्वत्रच चाचण्यांची संख्या अल्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सर्वांत अल्प लसीकरण झालेल्या आफ्रिका खंडात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे.

भारताचा जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंबंधी मूल्यांकनाविषयी तीव्र आक्षेप !

जागतिक आरोग्य संघटनेकडून (‘डब्ल्यू.एच्.ओ’कडून) कोरोनाला बळी पडलेल्यांच्या भारतातील संख्येविषयी प्रश्‍न उपस्थित करून ती संख्या ४७ लाखांहून अधिक असल्याचे सांगितल्यावर भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

वायूप्रदूषणामुळे प्रत्येक मिनिटाला जगातील १३ लोक पडतात मृत्यूमुखी !

विज्ञान हे मनुष्याला साहाय्यकारी ठरण्याऐवजी विनाशकारीच ठरत आहे, असेच या आकडेवारीतून सिद्ध होते ! सनातन धर्माचे अधिष्ठान घेऊन भौतिक प्रगती साधणे, हाच या भयावह जागतिक समस्येवरील एकमेव उपाय असल्याचे जाणा !

जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे ! – जागतिक आरोग्य संघटना

जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे. त्यामुळे श्‍वसनाच्या आजारांचा धोका वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये बहुतांश मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे.

कोरोनाचा ‘एक्सई’ हा नवा प्रकार ‘बीए-२’ पेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य ! – जागतिक आरोग्य संघटना

‘एक्सई’ हा कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या ‘बीए-२’ या उपप्रकारापेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य आहे;  परंतु याची निश्‍चिती करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.