निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २६३
१. आंब्यांच्या पेटीतील कुजका आंबा इतर आंब्यांनाही खराब करतो
‘आंब्यांच्या पेटीत एक कुजका आंबा असेल, तर तो इतर आंबे खराब करून टाकतो. आंब्यांच्या पेटीतील हा कुजका आंबा म्हणजे ‘दोष’ आहे; कारण हा स्वतः तर बिघडतोच; सोबत इतर आंब्यांनाही बिघडवतो.
२. आंब्याप्रमाणे असलेले वात, पित्त आणि कफ
वात, पित्त आणि कफ हेसुद्धा पेटीतील त्या आंब्यासारखे स्वतः बिघडून शरिरातील इतर घटकांनाही बिघडवू शकतात. यामुळे त्यांनाही आयुर्वेदात ‘दोष’ म्हटलेले आहे. दूषित होतात, म्हणजेच बिघडतात आणि इतरांनाही दूषित करतात (बिघडवतात) ते दोष ! हे संख्येने ३ आहेत. संस्कृतमध्ये ३ या संख्येसाठी ‘त्रि’ वापरतात. त्यामुळे वातादींना (वात आदींना, म्हणजे वात, पित्त आणि कफ यांना) ‘त्रिदोष’ असे म्हणतात.
३. ‘त्रिदोष’ याला समानार्थी शब्द
यापुढे ‘दोष’, ‘त्रिदोष’, ‘वातादी’ या शब्दांवरून ‘वात, पित्त आणि कफ’ हा अर्थ लक्षात घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan