निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २६१
आतापर्यंत या मालिकेत वात, पित्त आणि कफ यांचे जे विवेचन झाले, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे.
१. वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.
२. सृष्टीमध्ये वायु, सूर्य आणि चंद्र जे कार्य करतात, ते कार्य वात, पित्त आणि कफ शरिरात करतात.
त्यामुळे यापुढील आयुर्वेद सोपा होण्यासाठी ‘पोटात गुडगुडणारी किंवा गुदद्वारातून बाहेर पडणारी हवा’, म्हणजे ‘वात’, घशात-छातीत जळजळ निर्माण करते, ते पित्त आणि ‘खोकल्यातून बाहेर पडणारा बेडका’, म्हणजे ‘कफ’, असा आपला जुना चुकीचा समज काढून टाकला पाहिजे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan