वात, पित्त आणि कफ समजून घेणे का आवश्यक आहे ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २६२

१. मूलभूत गणिते समजल्यावर व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात

‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात. प्रत्येक गणिताचे वेगवेगळे उत्तर लक्षात ठेवावे लागत नाही.

२. वात, पित्त आणि कफ यांना समजून घेतल्यावर प्रत्येक रोगाचे निराळे औषध लक्षात ठेवावे लागत नाही

वात, पित्त आणि कफ हे शरिराचे मूलभूत घटक आहेत. एकदा का ते नीट समजून घेतले, म्हणजे रोग का होतात आणि त्यांच्यावर उपचार कसे करावेत, हे समजते. प्रत्येक रोगाचे वेगवेगळे औषध लक्षात ठेवावे लागत नाही. वात, पित्त आणि कफ यांना समजून घेणे अत्यंत सोपे आहे. शाळकरी मुलेही हे समजून घेऊ शकतात.

३. भावी आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त ज्ञान

सध्या जगात विविध ठिकाणी युद्धे चालू आहेत. ‘तिसरे महायुद्ध चालू झाले आहे’, असे काही तज्ञ सांगतात. ‘पुढचा काळ आपत्काळ आहे’, असे द्रष्ट्या संतांनी सांगून ठेवले आहे. ‘अशा काळात उपयोगी पडावी’, यासाठी आपण किती म्हणून औषधे साठवून ठेवणार ? त्यापेक्षा वात, पित्त आणि कफ यांना समजून घेतल्यास केवळ ३ ते ६ औषधांमध्ये किंवा बहुतेक वेळा, तर कोणत्याही औषधांविना नेहमीचे विकार बरे करता येतात. हेच आपण या लेखमालिकेत शिकणार आहोत. त्यामुळे प्रतिदिन न चुकता या लेखमालिकेचा अभ्यास करा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan