जुन्या वादविवादांचा आणि कलहांचा त्याग करा !
आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल.
आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल.
हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.
लोखंड जोवर तापून लाल झालेले आहे, तोवर त्याच्यावर घणाचे घाव घाला. आळशासारखे बसून काम होणार नाही. मत्सर आणि अहंकार यांना कायमचे दूर करा. या आणि आपल्या सार्या शक्तीनिशी कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात उतरा.
तथाकथित धनिकांवर विश्वास ठेवू नका, जिवंत असण्यापेक्षा ते मेलेलेच अधिक चांगले आहे. तुमच्यापैकी जे नम्र आहेत, जे शांत स्वभावाचे आहेत; पण जे श्रद्धासंपन्न आहेत, त्यांचीच काही आशा आहे. ईश्वरावर श्रद्धा असू द्या.
आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणवा; पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तींची आज्ञा पाळल्यावाचून केंद्रीकरण शक्य होणार नाही. वेगवेगळ्या शक्तींचे ….
दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
आपल्या जवळचे अन्न दुसर्याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.
कोणत्याही धर्मसंप्रदायाचे पतन त्याच दिवशी चालू होते, ज्या दिवशी त्यात धनिकांची पूजा चालू होते.
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रीला उत्तर दिले, ‘‘तुमच्याकडे केवळ आई सोडून इतर स्त्रियांना पत्नीसमान मानले जाते, तर भारतात केवळ पत्नी वगळता इतर स्त्रियांना मातेसमान मानले जाते.’’