आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?
आज आवश्यक आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि आवश्यकता पडल्यास महासागराच्याही तळाशी जाऊन अन् प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून घेईल.
आज आवश्यक आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि आवश्यकता पडल्यास महासागराच्याही तळाशी जाऊन अन् प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून घेईल.
बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बल हाच परम आनंद होय, शाश्वत आणि अमर जीवन होय. दुर्बलता, म्हणजे सतत भार, चिंता आणि दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय.
बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन ! संघटनेविना कोणतेही श्रेष्ठ आणि चिरस्थायी कार्य होत नाही.
समर्थांचे दैवत हनुमान होते. मारुति हा अकरावा रुद्र होता. समर्थ रामदासस्वामी हे मारुतिचे अवतार मानले जातात, जे बलोपासनेचे दैवत आहे.
२४ मे या दिवशीच्या लेखात आपण ‘समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !’, या अंतर्गत या ४ संतांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहिले. आजच्या शेवटच्या भागात त्यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी माहिती दिली आहे. (भाग ३)
‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…
सीता म्हणजे मूर्तिमंत पावित्र्यच होते. आपल्या पतीविना अन्य कोणत्याही पुरुषाचा देहाला ती स्पर्श करीत नसे. ‘सीता शुद्ध आहे काय असे विचारता ? ती तर साक्षात् पावित्र्यच आहे’, असे राम म्हणाले.
प्राचीन युद्धातील अस्त्रे आणि बाण यांच्या प्रभावी शक्ती या मंत्रसिद्ध होत्या. आपल्या सर्व शास्त्रांमधून हे सामर्थ्य गृहीत धरलेले आहे. आपण ही सर्व शास्त्रे काल्पनिक समजतो. ही आपली खुळी समजूत आहे.
धार्मिक क्षेत्रातील शीघ्र गतीने झालेली प्रगती आणि सर्वच विषयांमध्ये सर्वाेत्कृष्ट भाव ग्रहण करण्याची प्रवृत्ती यांमुळे हिंदु लोक उच्च ध्येयांना चिकटून राहिले. त्यामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे.
बाह्यतः जाणिवेच्या कक्षेत आपण सर्व द्वैती आहोत; परंतु त्या पलीकडे काय ? त्या पलीकडे आपण अद्वैती आहोत. वस्तूतः हेच सत्य आहे. अद्वैत मत सांगते की, प्रत्येक व्यक्तीला आत्मरूप समजून तिच्यावर प्रेम करा.