मुंबई – शिवसेना आणि भाजप हे ३० वर्षांपासून एकत्र निवडणूक लढले आहेत. आमची विचारधारा एकच आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत; मात्र ते अप्रसन्न आहेत, असा अपप्रचार केला जात आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी २ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे अप्रसन्न असल्यामुळे महायुतीच्या बैठका रहित झाल्या, अशी वृत्ते देण्यात आली; मात्र २ डिसेंबर या दिवशी महायुतीची कोणतीही बैठक नव्हती. त्यामुळे बैठक रहित होण्याचा प्रश्नच नाही. आझाद मैदानावर शपथविधीच्या कार्यक्रमाची पहाणी करण्यासाठी भाजपचे नेते जाणे स्वभाविक आहे; कारण या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. ’’