मंत्रीपदाच्‍या शर्यतीमधील भाजपच्‍या नेत्‍यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

देवेंद्र फडणवीस

मुंबई – मंत्रीपदाच्‍या शर्यतीत असलेल्‍या भाजपच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्‍थानी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार्‍यांमध्‍ये अतुल सावे, अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, राणा जगजीतसिंह पाटील, माधुरी मिसाळ, प्रतापराव चिखलीकर, महाराष्‍ट्राचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मंत्रीपदासाठी इच्‍छुक महाराष्‍ट्रातील भाजपच्‍या नेत्‍यांच्‍या कामकाजाची माहिती मागवली असल्‍याची माहिती भाजपच्‍या एका नेत्‍यानी दिली.