अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा ! – संजय राऊत

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा ! – संजय राऊत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राने देशाला देण्याची दानत दाखवली आहे; मात्र महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.

प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्‍यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय

(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय

ज्या परिषदेच्या आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात येते, ती परिषद अवैध नाही, असे म्हणता येईल का ?

पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !

पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !

‘पितांबरी’च्या १६५ वेगवेगळ्या पॅकिंगमधील ८२ हून अधिक अभिनव आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘पितांबरी’चं फिरतं दुकान’ असा अभिनव उपक्रम पितांबरीने चालू केला आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. राऊळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसाद अन् अखंड महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.

कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.