अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा ! – संजय राऊत

संजय राऊत

मुंबई – अर्थसंकल्पाचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे; परंतु यात महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही. अर्थसंकल्पातून राज्याची निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राने देशाला देण्याची दानत दाखवली आहे; मात्र महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

‘कोरोनाच्या विषाणूवर लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिले असतांना केंद्राच्या अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे’, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ‘या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे’, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

‘हा अर्थसंकल्प आत्मविश्‍वासाने भरलेला आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प आहे. नव्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारच्या विरोधात ओरडणार्‍या विरोधकांची तोंडे बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे’, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.