धिरयोवर(बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजीवर) राज्यात बंदी असतांना त्यांचे ठिकठिकाणी आयोजन होत असते ! पोलीस याकडे कानाडोळा करत असल्यानेच मुक्या प्राण्यांचा नाहक बळी जात आहे !
मुक्या प्राण्यांची झुंज लावून, ते जिवानिशी मरतांना पाहून मनोरंजन करून घेणारे पशूंहून क्रूर आहेत ! अशांवर जुजबी कारवाई करून सोडून न देता कठोर कारवाई होणे आवश्यक !
पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) – ७ एप्रिल या दिवशी दांडो-आगशी येथे बैलांचे मालक फ्रान्सिस डिसोझा (गोवा वेल्हा) आणि सुदेश दाबोलकर (मोरजी) यांनी धिरयो आयोजित केली होती. यामध्ये फ्रान्सिस डिसोझा यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मालकांच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(एम्) अन्वये गुन्हा नोंद करून त्या दोघांना अटक केली. पोलिसांनी बैलाचा मृतदेह कह्यात घेतल्यावर पशूवैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.