कासार्डे येथून सिलिका वाळूची वाहतूक करणार्‍या ११ ट्रकांवर कारवाई

कणकवली – कासार्डे येथील सिलिका वाळूची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने ७ एप्रिलला ११ ट्रकांवर कारवाई केली होती. या प्रकरणी ६ ट्रकांच्या मालकांना ९ लाख ८८ सहस्र २३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच उर्वरित ५ ट्रकांच्या मालकांना ‘ओव्हरलोड’ वाहतूक केल्याप्रकरणी ९६ सहस्र ९०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईत ११ ट्रकांच्या मालकांना एकूण १० लाख ८५ सहस्र १३० रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

७ एप्रिल या दिवशी सिलिका वाळूची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली. ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत वाहतूक करणारे ६, तर ‘ओव्हरलोड’ वाहतूक करणारे ५, असे एकूण ११ ट्रक कह्यात घेतले होते.