आध्यात्मिक उपाय आणि शारिरीक त्रास

‘एखाद्याला होणारा त्रास हा पूर्णतः शारीरिक स्तरावरील असल्यास यामध्ये केवळ आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी लाभ होण्यास पुष्कळ कालावधी लागू शकतो. होणारा त्रास आध्यात्मिक कि शारीरिक आहे, हे कळत नसल्यास आध्यात्मिक उपाय आणि वैद्यकीय उपचार दोन्ही सारखेच चालू ठेवावेत.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

स्वतःच्या समस्यांविषयी विचार करत रहाण्याने, तसेच त्यांविषयी इतरांना सतत सांगितल्याने मनाला नकारात्मक स्वयंसूचना दिल्याप्रमाणे होते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनाविषयक मार्गदर्शन

• ‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !’
• ‘देव व्यष्टी साधना करणार्‍याच्या नाही, तर केवळ समष्टी साधना करणार्‍याच्या कुटुंबियांची काळजी घेतो.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन

‘ज्या वेळी एखादा मंत्री भ्रष्टाचारी असतो, तेव्हा त्याला साहाय्य करणारे त्याचे स्वीय साहाय्यक हेही भ्रष्टाचारीच ठरतात; कारण बहुदा तेच त्यांना सर्व स्तरांवर साहाय्य करत असतात !’

‘प्रार्थना’, हीपण स्वेच्छाच असल्यामुळे ती तरी का करावी ?

आपण लायक असलो, तर देव देतोच आणि नसलो, तर प्रार्थना केली तरी देत नाही. तर मग प्रार्थना कशाला करायची ? प्रार्थना करणे, हीदेखील एका टप्प्याला स्वेच्छाच ! साधनेत स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा असे टप्पे असतात. सर्वकाही ईश्वरेच्छेनुसार होत असतांना प्रार्थना तरी का करावी ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

(म्हणे) ‘आता देशात संपूर्ण क्रांती आणायची आहे !’ – अरविंद केजरीवाल

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाची पाळेमुळे ‘आप’ कशी खणून काढणार ?, हेहीे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

. . . याउलट गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत यांसारखे ग्रंथ अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. काही शतकांनंतर आजही त्यांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ अध्यात्माशी संबंधित, म्हणजे सत्य सांगणारे कार्य, लिखाण हे चिरंतन टिकणारे असते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठोर साधनेचे महत्त्व !

बहिणाबाईंनी जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आयुर्वेदातील वेदरूपी आध्यात्मिक प्रकाश प्रकट करण्यासाठी नियमित साधना केली पाहिजे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अमेरिकेसारखा देश आयुर्वेदातील गुप्त दिव्य ज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील आजार बरे करत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे.