‘प्रार्थना’, हीपण स्वेच्छाच असल्यामुळे ती तरी का करावी ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उच्च आध्यात्मिक स्थिती दर्शवणारे त्यांचे ‘प्रार्थने’च्या संदर्भातील विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मी आजवर भगवंताला कधीही कशासाठीही, अगदी हिंदु राष्ट्रासाठीही एकदाही प्रार्थना केली नाही; कारण ‘भगवंत योग्य तेच करतो’, अशी माझी श्रद्धा आहे; म्हणूनच गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेत निराळी प्रार्थना शिकवली जात नाही. केवळ भावजागृती आणि अहंनिर्मूलन यांचे एक माध्यम म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले जाते.

आपण लायक असलो, तर देव देतोच आणि नसलो, तर प्रार्थना केली तरी देत नाही. तर मग प्रार्थना कशाला करायची ?

प्रार्थना करणे, हीदेखील एका टप्प्याला स्वेच्छाच होते. साधनेत स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा असे टप्पे असतात. सर्वकाही ईश्वरेच्छेनुसार होत असतांना प्रार्थना तरी का करावी ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)