Trump To Visit India :  ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्‍यावर येणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारत दौर्‍यावर येणार आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दिली. या दौर्‍याच्या सिद्धतेला अंतिम रूप देण्यासाठी मी लवकरच भारताचा दौरा करीन, असेही रुबिओ यांनी सांगितले. याआधी ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात फेब्रुवारी २०२० मध्ये भारताला भेट दिली होती.

रबिओ पुढे म्हणाले की, उभय देशांमधील संबंध सशक्त आहेत असून ‘जी-७’ शिखर परिषदेत ट्रम्प अन् पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या अलीकडील बैठकीनंतर त्यात सुधारणा झाली आहे. भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र देश आहे आणि पंतप्रधान मोदी अन् राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संबंध उत्कृष्ट आहेत.