गोमांस, डिपफ्रिजर आणि दुचाकीसह सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी – तालुक्यातील फणसवळे येथे गोवंशियांचे अवशेष सापडल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून पोलीस ठाण्यात धडक देत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याविषयी निवेदन दिले होते. याच वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी गोवंशियांची तस्करी रोखण्याचे आश्वासन दिले. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांजेकरनगर, उद्यमनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून ५१ किलोपेक्षा अधिक गोमांसासह लियाकत शौकत दावत या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एका दुचाकीसह अनुमाने १ लाख ६ सहस्र ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२६ जून २०२६ या दिवशी दुपारी ४:५५ वाजण्याच्या सुमारास लांजेकरनगर येथे आरोपी लियाकत दावत हा विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक करत असल्याची आणि स्वतःच्या लाभासाठी ते विक्रीकरता बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस (किंमत १६,४८०)
आणि दुचाकी वाहन (होन्डाची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (किंमत ७० सहस्र रुपये.)
आणि मांस साठवण्यासाठी वापरण्यात आलेला डिपफ्रिजर (किंमत २०,००० रुपये.)
आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५, तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), ५ (क), ९ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम ६६(१), १९२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !