तिघांना अटक !

मुंबई – संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची २८ जून या दिवशी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) होणार होती; मात्र या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे फुटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टीईटी परीक्षा रहित करण्याची नामुष्की शासनावर ओढावली आहे. एकाकडे या प्रश्नपत्रिका असल्याची माहिती कळल्यावर पोलिसांनी तिथे धाड घातली, तसेच ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या अधिकार्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली. त्या गृहस्थाकडील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना कह्यात घेतले आहे.
परीक्षेची पुढील तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. शिक्षकांना पुन्हा या परीक्षेसाठी नोंदणी करावी लागणार नाही, तसेच परीक्षेचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ३७ शहारांत १ सहस्र २८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता घेतली जाणारी ही राज्यस्तरीय परीक्षा आहे.
नुकत्याच झालेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे अजूनही पूर्णपणे मिळालेले नसतांना हे नवीन प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.
आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल ! – शिक्षणमंत्री
प्रश्नपत्रिका विकायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पकडलेल्यांपैकी १ हरियाणा आणि २ जण बिहार येथील आहेत. प्रश्नपत्रिका देहलीवरून आणल्या होत्या. मुख्य आरोपी अद्याप पसार आहेत. एक आरोपी केंद्रीय विद्यालयात चाकरी लावण्यासाठी आला होता. एक आरोपी पूर्वी अनुत्तीर्ण झाला होता. आरोपींनी प्रश्नपत्रिका कुणाला विकल्या ?, याचे अन्वेषण चालू आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी माध्यमांना वरील माहिती दिली. शासनाने याची गंभीर नोंद घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !