विधान परिषद प्रश्नोत्तरे

मुंबई, २६ जून (वार्ता.) – राज्यातील २१ सहस्र ६४१ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांपैकी १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्थाच नाही, अशी धक्कादायक माहिती सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधान परिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतांनाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मुलींना असुरक्षित वातावरणात आणि मूलभूत सुविधांविना शिक्षण घ्यावे लागत आहे. विधान परिषदेत आमदार श्रीमती चित्रा वाघ, श्री. प्रवीण दरेकर, श्री. प्रसाद लाड आणि अन्य आमदारांनी या समस्येविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार श्रीमती चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील ३ सहस्र ३२८ शाळांमध्ये स्वच्छतागृहांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसून तुटलेली दारे आणि सुरक्षेचा अभाव यांमुळे विद्यार्थिनींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. शाळांमध्ये विनामूल्य सॅनिटरी नॅपकिन आणि स्वतंत्र प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावणार्या संबंधित घटकांवर काय कारवाई केली ?
या वेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज अन् सॅनिटरी पॅड मिळणारे यंत्र यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करून पुढील ४ ते ६ महिन्यांत आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जातील. काही शाळांमध्ये वाचनालयाची खोली, तसेच मुले-मुली यांना स्वच्छतागृहे अद्याप उपलब्ध नाही. या सुविधा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच विविध शासकीय आणि सामाजिक निधींचा वापर केला जाईल.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध