कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांची केंद्रशासनावर टीका

बेंगळुरू (कर्नाटक) – जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘डीप-टेक’, या दिशेने वेगाने पुढे जात आहे. तथापि भारताच्या अभिमानास्पद प्रमुख आयआयटी शैक्षणिक संस्थानांना पुनर्जन्म, ज्योतिषशास्त्र आणि गो-विज्ञान यांसारख्या विषयांवर संशोधन करण्यास सरकार जुंपत आहे, अशी टीका कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केली.
The world is racing towards quantum computing, advanced semiconductors, AI and deeptech.
Meanwhile, some of India's premier institutions are being nudged towards researching reincarnation, astrology-linked past life memories and cowtech.
Modi govt allocated Rs 98 cr for…
— Priyank Kharge / ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ (@PriyankKharge) June 23, 2026
ते पुढे म्हणाले की,
मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘काऊ-पॅथी’ (गो आधारित उत्पादनांचे विज्ञान) संशोधनासाठी ९८ कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहेत. देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थानांमध्ये विज्ञानाच्या नावाखाली पुराण शिकवले जात आहे. हे चिंताजनक आहे. आपला इतिहास, परंपरा किंवा प्राचीन ज्ञान प्रणालींचा अभ्यास करण्यात काहीच चुकीचे नाही; परंतु अशा छद्म विज्ञानाला किंवा अंधश्रद्धेला अधिकृतपणे संस्थात्मक केले जाणे, ही खरी समस्या आहे. (भारतातील प्राचीन ज्ञान प्रणालींना निराधारपणे अंधश्रद्धा संबोधणे, ही अंधश्रद्धा नव्हे का ? या ज्ञानप्रणाली छद्म विज्ञान असल्याचे म्हणणे, याला कोणता वैज्ञानिक आधार आहे ? – संपादक) प्रतिष्ठित आयआयटीच्या आत गुपचूप शिरत असलेल्या अशा प्रवृत्ती देशाची वैज्ञानिक प्रगती रोखणार्या आहेत.
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !