Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !

यूट्यूबर नाजिया इलाही खान यांच्या विरोधात पोलिसांच्या समोर दिल्या गेल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

ठाणे – यूट्यूबर (स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ अपलोड करणारी व्यक्ती) नाजिया इलाही खान यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरोधात कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुसलमान समाजातील महिलांनी मोठी गर्दी करून निदर्शने केली. काही आंदोलक महिलांनी ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याची एकच शिक्षा आहे – शिरच्छेद) अशी चिथावणीखोर घोषणा दिली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध महिलांकडून पोलीस ठाण्यात जाऊन घोषणा देण्याचे धाडस केले जाते ! – संपादक) घोषणा चालू असतांना पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात होता; मात्र प्रसारित झालेल्या चित्रीकरणाच्या आधारे ‘उपस्थित पोलिसांनी महिलांना तात्काळ थांबवून कारवाई केली नाही’, असा आरोप नागरिकांनी केला आहे. (यापेक्षा दुर्दैव ते काय ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shifa Mahshar Pawle (@shifapawle)

भाजपच्या कार्यकर्त्या शिफा पावले यांच्या तक्रारीवरून यूट्यूबर नाजिया इलाही खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचे अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !