
बिजनोर (उत्तरप्रदेश) – पोलिसांनी नूरपूर येथे ‘उत्तरप्रदेश गोहत्या प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत एका व्यक्तीला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
कोशांबी (उत्तरप्रदेश) – कोशांबी जिल्ह्यातील सराई अकिल पोलीस ठाण्याच्या सीमेतील पनारा गोपालपूर गावात गोमांस शिजवले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी धाड घातली. पोलिसांना पहाताच घरातील ४ पुरुष पळून गेले. याविषयी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील अल्वाल येथे महंमद अफ्रोज (२८ वर्षे) याने एका १७ वर्षीय हिंदु मुलीशी सामाजिक माध्यमातून ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अफ्रोजच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आल्यावर ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
आंबेडकर नगर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील टांडा भागातून एका १६ वर्षीय हिंदु मुलीला २४ जूनला जुबेर उपाख्य अटल याने फूस लावून घरून पळवून नेले. जुबेर तिला सुलतानपूरमधील आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला असावा, असा संशय आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत.
इटावा (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका हिंदु तरुणीने एका मुसलमानावर आपली धार्मिक ओळख लपवून संबंध प्रस्थापित केल्याचा आणि विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला. राजपूत समाजातील ‘राजा’ असल्याचे भासवणार्या या मुसलमानाने जेव्हा तरुणीने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी तिला धमकावले. ती त्याच्या घरी ते घेण्यासाठी गेली असता त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केली अन् तिचा भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक हिसकावून घेतला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !