दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ

श्रीराममंदिरातील दान चोरीचे प्रकरण

श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

उडुपी (कर्नाटक) – श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, अशी प्रतिक्रिया उडुपी पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी व्यक्त केली. ते ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सदस्यही आहेत.

११ जुलैला न्यासाची बैठक होणार असून त्यात हा विषय चर्चिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह ‘सरकार योग्यरित्या अन्वेषण करेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.