भाजपच्या प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक आणि माईक जप्त करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा आदेश !
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पहिल्या दिवशी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने विधीमंडळाच्या पायर्यावर बसून प्रतिविधानसभा घेतल्याचे पडसाद विधानसभेत उमटले.