पुनश्‍च हरि ॐ !

‘हिंदु राष्ट्र’ हीच भारत आणि नेपाळ दोघांचीही सनातन ओळख आहे. आज नेपाळमधील जनतेने त्याची मागणी तीव्र करत नेली आहे आणि येत्या काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. भारत आशियातील महत्त्वाचे राष्ट्र असल्याने या जनतेला भारताकडून मिळणारा पाठिंबा हा पुष्कळ साहाय्याचा ठरणार आहे. भारताकडून तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.

(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले !’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

मुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत !

हिंदुस्थानचे अध:पतन वेदनिष्ठा ढळल्याने आणि परंपरांची कास सोडल्याने झाले !

हिंदु म्हणून घेण्यास लाज वाटावी, इतके आमचे अध:पतन झाले आहे. राजसत्तेने आणि समाजसत्तेने परंपरांचा विध्वंस करून हे अध:पतन घडवून आणले. याविरुद्ध आम्हाला सर्व बाजूंनी रान पेटवायचे आहे.

परकीय आक्रमणांपेक्षा धर्मद्वेष्टे झालेले स्वतंत्र भारतातील निधर्मी शासनकर्ते !

मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही.

माकपकडून जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप करत दलित महिला इस्लाम स्वीकारण्याच्या सिद्धतेत !

माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष ! एरव्ही दलितांच्या नावाने राजकारण करणारे बहुतेक राजकीय पक्ष आता तोंड का उघडत नाहीत ? या महिलेने इस्लाम स्वीकारू नये, यासाठी हिंदु संघटनांनीही प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – कमल थापा, माजी उपपंतप्रधान  

जगात ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध आदी धर्मियांसाठी अनेक स्वतंत्र देश आहेत; पण भारत आणि नेपाळ या देशांत बहुसंख्य असलेल्या हिंदूंना स्वतःचे असे एकही राष्ट्र नाही. यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !