आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

दुष्‍ट व्‍यक्‍तीविषयी शास्‍त्रवचने
खलानां कण्‍टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्‍मुखभङ्‍गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्‍ट मनुष्‍य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्‍भवं हेममृगस्‍य जन्‍म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्‍नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्‍ति॥
अर्थ : सोन्‍याच्‍या हरिणाचा जन्‍म अशक्‍य; पण रामाला त्‍याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विद्वत्त्वं च नृपत्वं चं नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते॥
अर्थ : विद्वत्ता आणि राजेपण यांची बरोबरी कधीच होणार नाही. राजाला त्याच्या देशात मान दिला जातो, तर विद्वानांचा सर्वत्र आदर होतो.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आपद़्‍सु न त्‍यजेद़् धैर्यम् संपत्‍सुचन नम्रताम् ॥
अर्थ : संकटे आली असता मनुष्‍याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्‍या म्‍हणजे उत्‍कर्षाच्‍या काळात नम्रता सोडू नये.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आश्रमान् तुलया सर्वान् धृतान् आहुः मनीषिणः ।
एकतश्‍च त्रयो राजन् गृहस्‍थाश्रमः एकतः ॥ – महाभारत, शांतिपर्व
गृहस्‍थ हा आपली कर्तव्‍ये करून कुटुंबाचे आणि समाजाचे पोषण करतो. म्‍हणून तो सर्वश्रेष्‍ठ !

संस्‍कारित वाणी हेच माणसाचे खरे भूषण !

माणसाला बाजूबंद, चंद्रासमान हार, स्नान, उटणे, फूल किंवा सजवलेले केस भूषवत नाहीत. संस्‍कारित अशी वाणीच माणसाला भूषवते. अन्‍य भूषणे नाश पावतात. वाणी हे चिरकाल टिकणारे भूषण आहे.

असा निर्णय केंद्र सरकारनेही घ्यायला हवा !

संस्कृत भाषा आणि वेद यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकार पारंपरिक निवासी गुरुकुल पद्धतीवर चालणार्‍या संस्कृत पाठशाळा अन् केंद्र यांना आर्थिक अनुदान देणार आहे.

गोवा सरकार संस्कृत पाठशाळा आणि केंद्रे यांना अनुदान देणार !

गोव्यात प्रत्येकी ३ संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत केंद्रे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सरकार संबंधित संस्थांना १०० टक्के वेतन अनुदान, तसेच पाठशाळेसाठी वार्षिक देखभाल खर्च ५ लाख रुपये आणि संस्कृत केंद्रासाठी १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

उत्तराखंडमधील मदरशांत संस्‍कृत भाषा शिकवणार ! – वक्‍फ बोर्डाचा निर्णय

उत्तराखंडमधील मदरशांमध्‍ये ‘राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्‍या अंतर्गत येणारे विषय शिकवले जाणार आहेत. यात संस्‍कृतचाही समावेश आहे.